spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहरात रात्रंदिवस ६० पथकांची निगराणी

– आदर्श आचार संहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी मनपाच्या कडक उपाययोजना

नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६च्या काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर निगराणी ठेवण्यासाठी शहरात ६० भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. मनपाच्या दही झोन झोनमध्ये ६ पथके तैनात आहेत. ही पथके २४ बाय ७ कार्यरत असणार आहेत.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात राज्य निवडणूक आयोगाद्वारे प्राप्त निर्देशांचे तंतोतंत पालन केले जात आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता लावून देण्यात आलेल्या आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मनपातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे.

मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत व अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडताना कोणत्याही आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

निवडणूक काळात कोणत्याही प्रकारे आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यावर निगराणी राखण्याची व भरारी पथकाची मुख्य जबाबदारी उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्यावर सोपविण्यात आली आहे.प्रत्येक झोन मध्ये ६ पथके तैनात राहणार आहेत. प्रत्येक पथकासोबत २ अधिकारी असणार आहेत. मनपाच्या पथकासोबत पोलीस व व्हीडीओग्राफर सुद्धा राहणार आहेत. या पथकाला पंचनामा तसेच जप्ती करण्याचे अधिकार आहे.

Popular Articles