spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 63 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, भुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरूवार (ता.27) शोध पथकाने 63 प्रकरणांची नोंद करून 44,200 रुपयाचा दंड वसूल केला.

हाथगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3,600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपार्थ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 23,000 रुपयांची वसुली करण्यात आली.

सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसूली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 6,000 रुपयांची वसूली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 21 प्रकरणांची नोंद करून 4,200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून रु.3,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. मंगलदीप सभागृह यांनी सांडपाण्यासाठी डिसेल्टींग चेंबर न आढळल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत प्राप्ती बैरागी यांनी अनधिकृत भूखंडावर हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. सौहन कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्याने रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. हॉटेल इंपेरीयल यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्याने रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत वृजलालजी शारदा यांनी विनापरवानगी सार्वजनिक रस्ता तोडल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. लखन किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. ड्रीम विला कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्याने रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. खेमानी इंफ्रा यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्याने रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.55,000 दंड वसुल केला.

Popular Articles