spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 67 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार(ता.11)शोध पथकाने 67 प्रकरणांची नोंद करून 32,200 रुपयाचा दंड वसूल केला.हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 26 प्रकरणांची नोंद करून 10,400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 100 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 400 रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000 रुपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 8,500 रुपयांची वसुली करण्यात आली.चिकन सेंटर,मटन विके्रता यांनी त्यांचा कचरा रस्ता,मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.1,000 रूपयाची दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 19 प्रकरणांची नोंद करून 3,800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून रु.4,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धंतोली झोन अंतर्गत मे.लुमेन सोलर यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू. ५,००० चे दंड वसूल करण्यात आले. तसेच मे. पुरूष्षोत्तम इंफ्रास्ट्रक्चर यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 दंड वसुल करण्यात आले.गांधीबाग झोन अंतर्गत मे. निखील स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.निनावे अगरबत्ती शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले.मंगळवारी झोन अंतर्गत मनिष अवस्ती यांनी फुटपाथवर चिखल व टाकावू पदार्थ टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे.टाटा एक्झीबिशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू. ५,००० चे दंड वसूल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू.35,000 दंड वसूल केला.

Popular Articles