spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 70 प्रकरणांची नोंद

उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर, १० : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.  मंगळवार (ता.9) रोजी शोध पथकाने 70 प्रकरणांची नोंद करून 36,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 10,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रू. 2,400/- चे दंड वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यावसायिकाने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 3,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 22 प्रकरणांची नोंद करून 4,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून रु. 7,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.स्मार्ट सुपर स्टोअर्स यांनी दुकानाचा कचरा फुटपाथवर टाकल्याने रू.5,000/-चे दंड वसुल करण्यात आले.धरमपेठ झोन अंतर्गत मे. ड्रीम लोटस यांनी बांधकामामुळे चेंबर क्षतीग्रस्त करून ब्लॉक केल्यामुळे रू.10,000/- दंड वसुल करण्यात आले.धंतोली झोन अंतर्गत मे.देवेन्या-9 यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले.नेहरूनगर झोन अंतर्गत मे. हॉस्पीटल रेसीडेंसी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. कॅलीबर्स नोवा यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू. 5,000/-दंड वसुल करण्यात आले.सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे. शेख गृह उद्योग यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/-चे दंड वसूल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे. लखोटीया ट्रेडर्स यांनी खुल्या भुखंडावर कचरा जाळल्यामुळे रू.5,000/-दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.हॉटेल बरतानीया यांनी हॉटेलच्या पहिल्या माळयावर निरूपयोगी वस्तू ठेवल्याने रू.10,000/-चे दंड वसुल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू. 60,000/- दंड वसूल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.