सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- नगरपरिषदच्या वतीने भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नवनियुक्त नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. कार्यक्रमात रामजी महाजन शाळेतील विद्यार्थ्यांनी बँड द्वारे राज्यगीत व राष्ट्रगीताचे प्रदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी भाषणपर दोन शब्द बोलतांना नगराध्यक्षांनी त्यांचा आदर्श रामटेक मधील सर्व विद्यार्थ्यांनी घेऊन यशाच्या पायऱ्या चढत जावे, असा संदेश दिला. याप्रसंगी नवनियुक्त नगरसेवक, मुख्याधिकारी पल्लवी राऊत, अधिकारी तथा नगरपरिषद रामटेक येथील कर्मचारी उपस्थित होते. प्रकाश ऊईके यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले.








