किशोर साहू, मौदा, ता. २९ :- 26 जानेवारी 2026 या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर रिहान हॉस्पिटल रामटेक व आकाश झेप फॉउंडेशन चा संयुक्त विद्यमानाने महारक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात युवक वर्गांनी या ठिकाणी सहभाग घेऊन रक्तदानाचा मोलाचे सहकार्य केले. तसेच चाचेर गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ता राकेश गोविंदराव राऊत (55 )यांनी जीवनात महत्त्वाच्या निर्णय घेऊन या ठिकाणी मरणोत्तम देहदान च्या निर्णय घेऊन मरण पावल्यानंतर स्वतःचे अवयव दान करण्याच्या अतिशय महत्त्वाच्या निर्णय त्यांनी घेतलेला आहे. या अतिशय महत्त्वाच्या निर्णयाकरता स्वतः त्यांनी मरणोत्तर देहदान इच्छापत्र स्वलिखित रिहान हॉस्पिटल या ठिकाणी देण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयामुळे भविष्यात जे गरजू लोक असतील ज्यांचे अवयव खराब झालेले असतील. अशा सर्व वयोगटातील व्यक्तींना त्यांचे अवयव हे कामी ठरणार आहेत. ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या निर्णय घेणारे चाचेर गावातील प्रथम:ता व्यक्ती ठरलेले आहेत.याकरिता गावात व परिसरात त्यांच्या नावाचा मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. याप्रसंगी रिहान हॉस्पिटल रामटेक येथील डॉ. बोरकर , डॉ. बोरकर, साक्षोधन कडवे , माजी सरपंच महेश कलारे, भाजपा किसान आघाडी ग्रामीण नागपूर, जिल्हामंत्री विनोद कोपरकर, मिलिटरी मॅन बंधाटे यांच्या समक्ष निर्णय घेऊन राकेश गोविंदराव राऊत यांनी ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल रिहान हॉस्पिटल रामटेक च्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन व शाल श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.याप्रसंगी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी व बाहेरून आलेले सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर चाचेर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांच्या देहदानाचा संकल्प









