spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कट्टा येथील समाधान शिबिरात ८४० लाभार्थ्यांना थेट लाभ

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी देवलापार मंडळ येथे गोंडवाना सांस्कृतिक भवन, ग्रामपंचायत कट्टा शनिवार (दि.१४) येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेवर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, उपविभागीय अधिकारी, रामटेक यांचे मार्गदर्शनाखाली व पुनम कदम, अप्पर तहसिलदार देवलापार यांचे नियोजनाखाली सदर शिबीर यशस्वीरीत्या आयोजीत करण्यात आले. सदर शिबीरात विजयालक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त, नागपूर उपस्थित होते. नोडल अधिकारी अखिल भारत मेश्राम, तहसिलदार, संगांयो, नागपूर, माजी जि. प. सदस्य शांताताई कुंभरे, माजी सभापती, चंद्रकांत कोडवते, माजी सभापती संजय नेवारे, कट्टा सरपंच वनीता टेकाम, वडांम्बा सरपंच मुकेश दुबे, डोंगरताल सरपंच उपेश उईके, कट्टा उपसरपंच विशाल वरठी तसेच देवलापार मंडळातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात देवलापार मंडळांतर्गत विविध विभागामार्फत एकूण ८४० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. शिबिरात शासनाच्या विविध योजनेची माहिती देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. शिबिरामध्ये देवलापर मंडळातील ग्रामपंचायत देवलापार कट्टा डोंगरताल पिपरिया बांद्रा व वडांबा या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिराच्या लाभ घेतला. महसूल विभागामार्फत ७/१२ उतारे, फेरफार नोंदणी, उत्पन्न, जात, अधिवास व इतर तलाठी दाखले देण्यात आले. तसेच आधार नोंदणी, पुरवठा विभाग, आरोग्य तपासणी, महिला व बालविकास विभागामार्फत बेबी केअर किट, कृषी विभागाच्या योजना, पंचायत समिती सेवा, बस प्रवास सवलत प्रमाणपत्रे तसेच अन्य विभागांच्या सेवांचा लाभनागरिकांनी घेतला. यावेळी महसूल, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, पंचायत समिती तसेच इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles