कामठी :- राज्याचे महसूल व नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थानिक निधीतून करोड रुपये मंजूर सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले येरखेडा नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 15 शुभम नगर ,वार्ड क्रमांक 16 गणेश लेआउट, रविदास नगर ,वार्ड क्रमांक 17 यशोधरा नगर येथील अंतर्गत रोड करीता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थानिक निधीतून करोड रुपये मंजूर सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष राजकिरण बर्वे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष रंजना प्रशांत काळे, येरखेडा भाजपा अध्यक्ष राकेश काळे, महिला आघाडी अध्यक्ष राजश्री धीवले ,व्यापारी आघाडी अध्यक्ष ईश्वरसिंग चौधरी ,पाणीपुरवठा सभापती एडवोकेट आशिष वंजारी ,स्वच्छता सभापती नरेश मोहबे, सत्तापक्ष नेता गजानन तिरपुडे, नगरसेविका मंदा प्रमोद महाले पाटील ,योगिता राजेश काळे ,सुशांत सलाम, मनीषा गोंडाने ,राजेंद्र चौरे, सुदाम राखडे ,विलास पाटील ,राकेश खरवले ,मनीष भाटी, सोनू सूर्यवंशी ,शीला बंडीवार ,सरिता पोटभरे, संध्या शेंडे, रेखा मराठे, कविता रायबोले ,सुशील धांडे ,जॉनी भस्मे सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष राजकिरण बर्वे म्हणाले, राज्याचे महसूल व नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येरखेडा नगरपंचायत निवडणुकीदरम्यान दिलेले विविध आश्वासनाची पुरता विविध विकास कामातून पूर्ण करण्यात येत आहे विकास कामासाठी नगरसेवक व नागरिकांनी सहकार्य करण्याची आव्हान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट आशिष वंजारी यांनी केले संचालन सुदाम राखडे यांनी केले व आभार प्रदर्शन राजेंद्र चौरे यांनी मांनले भूमिपूजन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
येरखेडा नगरपंचायत अंतर्गत सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



