नागपूर ०२ : अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे सोमवारी ३० जून रोजी सार्वजनिक समाज भवन रामेश्वरम व हनुमान मंदिर अमरनगर येथे लक्ष्मणराव कोहळे, रामदास गौरखेडे, गोपाळराव सोरते, अरुण कोहाड, सौ.वंदना बोरकर या पाच सदस्यांचा सामूहिक वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात सत्कारमूर्तींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना वाढदिवसाच्या व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष देवीदासजी आगरकर, उपाध्यक्ष गणपतराव निंबाळकर सचिव, वसंतराव इझनकर, सहसचिव डॉ. राजेश कुऱ्हाडे, रमेश जिल्हारे, रामेश्वर बांगडे, रामदास माहुरे, अशोक सांभारे, भोयर, वरघट, शिरपूरकर, धवल, चिंचुलकर, ज्योती निंबाळकर, रासेकर, शोभा आगरकर , गौरखेडे, राजुरकर, धनजोडे, कोहळे, जिल्हारे, यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सुरुवात सुगम संगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन देवीदासजी आगरकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता भोजनाने करण्यात आली.
अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



