नागपूर, ०३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. (ता.2) बुधवार रोजी शोध पथकाने 55प्रकरणांची नोंद करून 46,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 38 प्रकरणांची नोंद करून 15,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 09 प्रकरणांची नोंद करून 3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून 16,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून रू.1000/- रूपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 31 प्रकरणांची नोंद करून 6,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 04 प्रकरणांची नोंद करून रु. 4,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. माउली हाउसेस अँड प्लाटिनम यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. तर धरमपेठ झोन अंतर्गत मे. लिटील मिलिनियम स्कूल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याबद्दल रू.10,000/- रूपयांची वसुली करण्यात आली. तसेच मे. प्रीतम प्राईड यांनी अनधिकृत ठिकाणी कचरा टाकल्याबद्दल रू.10,000/- रूपयांची वसुली करण्यात आली. हनुमान नगर झोन अंतर्गत मे.गुरूमाउली डेव्हलपर्स व मे. आयुष प्रेसटीज अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल प्रत्येकी रु. 10,000/- या प्रमाणे असे एकूण रू.20,000/- चे दंड वसूल करण्यात आले. धंतोली झोन मे.श्याम स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/-चे दंड वसूल करण्यात आले.तसेच मे.साई माउली रेसिडेंसी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. अजय किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. मे.स्टेट कानव्हेंट स्कूल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याबद्दल रू.5,000/- रूपयांची वसुली करण्यात आली.आशीनगर झोन अंतर्गत मे. हेमंत स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 10 प्रकरणांची नोंद करून रू. 80,000/- दंड वसूल केला.





