खापा, वार्ताहर :- नुकत्याच युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर अंतर्गत सावनेर तालुका शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा पंचमुखी हनुमान मंदिर बेलोरी ( पाटनसावंगी ) येथे नुकताच पार पडली. 14, 17, 19 वर्ष वयोगटातील मुले मुली असे एकुण 16 शाळेतील 90 विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत नगर परिषद खापा द्वारा संचालित पिएमश्री नगर परिषद राजेंद्र हायस्कूल येथील 14 वर्ष वयोगट भावेश विनोद चौधरी (48 कि.), 17 वर्ष वयोगटात नेहल भगवान बडवाईक (51 कि.), तर ग्रिकोरोमन गटात रेवार्थ नरेंद्र खुबाळकर (45 कि.), संदेश सुरेश मरकाम (51 कि.), मोहित संदिप ढोबळे (55 कि.), भावेश राजेंद्र नाचनकर (60 कि.), पुष्कर विनोद चौधरी (65 कि.), 19 वर्ष वयोगट विक्रांत भगवानदास अडमाची (55 कि.) मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. नागपुर येथे होणाऱ्या जिल्हा स्तरावर कुस्ती क्रीडा स्पर्धेत सहभागी होतील.
पी एम राजेंद्र हायस्कूल चे मुख्याध्यापक सुनिल नेहारे, न. प. खापा मुख्याधिकारी सुमेध अलोने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश मोहटे, शिक्षक असलम खान, प्रमोद बावनकुळे, सुनील हेडाऊ, विजय नांदेकर, सुनील भांगरे, अनिल टेकाडे, श्रीकृष्ण मौंदेकर, सुनील गाडीगोणे, निता चामाटे, भाग्यश्री सांडे, प्रतिभा खोब्रागडे, नम्रता मडके, सोनाली सावनकर, लोकेश कोमटे, प्रविण मेश्राम, यांच्यासह शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, विद्यार्थ्यांचे पालक आदींनी विद्यार्थ्यांना मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडू पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक शामराव खडसे यांच्या मार्गदर्शनात कुस्तीचा सराव करतात.




