spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठीत डम्पिंग यार्ड प्रश्नावर तोडगा : पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्थीने ग्रामस्थ शांत

संदीप कांबळे

– रस्त्यावर कचरा टाकण्यास नगर परिषदेची आळा घालण्याची हमी

कामठी :- कामठी-आजनी मार्गावर नगर परिषदेकडून रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा व मेलेली जनावरे यामुळे संतप्त झालेल्या आजनी गावकऱ्यांनी सोमवारी दुपारी रस्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे वाहतुकीवर काही काळ अडथळा निर्माण झाला होता.

सूचना मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी तातडीने हस्तक्षेप करत ग्रामस्थांना आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. पुढील तोडगा काढण्यासाठी   पोलिसांनी सर्व संबंधितांना चर्चेसाठी एकत्र आणले.

यासंदर्भात पोलीस निरीक्षक आंधळे यांनी आजनी गावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह काही गावकऱ्यांची, नगर परिषद स्वच्छता विभाग व कचरा संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांची पोलिस स्टेशनमध्ये बैठक आयोजित केली. या चर्चेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

डम्पिंग यार्ड संबंधी मिटिंग मध्ये आजनीचे सरपंच, पोलिस पाटील, सदस्य आणि काही युवक तसेच नगर परिषद कार्य अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी आपसी सामंजस्याने तोडगा काढत या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून जो कोणी रस्त्यावर कचरा टाकेल त्यास दंडीत केल्या जाईल तसेच डम्पिंग यार्डला गेट लावण्यात येईल असे ठरले. भोवताल पसरलेला कचरा हटवण्यासाठी अधिकाऱ्यांनी दोन दिवस मागितले असून, या उपरांत काहीच कारवाई झाली नाही तर, ग्रामस्थ २ ऑक्टोबरला पुन्हा तीव्र आंदोलन करतील अशी चेतावणी आजनी ग्रंथांच्या वतीने देण्यात आली आहे. बैठकीत सविस्तर चर्चेनंतर नगर परिषदेकडून रस्त्यावर कचरा व प्रेतावस्थेतील जनावरे टाकले जाणार नाहीत, याची जबाबदारी स्वच्छता विभागाने घेतली. हा आश्वासक तोडगा निघाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

या घटनेमुळे पोलिसांच्या मध्यस्थीने ग्रामस्थ-नगर परिषद यांच्यात समन्वय साधला गेला असून डम्पिंग यार्ड प्रश्नावर काही प्रमाणात तोडगा निघाला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.