परिमंडळ पाच मधून २१४ गुन्हेगार हद्दपार

0
69

कामठी, ता.25 :– पोलीस आयुक्तालय नागपूर शहर अतर्गत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क्रमांक 05, नागपुर शहर मधिल पोलीस ठाणे कोराडी, जरिपटका, कपील नगर, यशोधरा नगर, नविन कामठी, जुनी कामठी, खापरखेडा, कळमणा, पारडी असे एकुण 09 पोलीस ठाणे येथिल नवरात्र, दुर्गा स्थपना व विसर्जन, धम्मचक प्रवर्तन दिन या सण उत्सवाचे काळात कायदा व सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहणेकामी शरीराविरूध्द, मालमत्तेविरूध्द, गुन्हे करणारे तयेच अवैध धंदे व दारूविक्री करणारे एकूण 213 आरोपींना पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क्रमांक 05. नागपुर शहर यांना प्राप्त विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदाच्या अधिकारान्वये कलम 163 (2) बी.एन. एस. एस. अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून आगामी सण उत्सवाचे काळात कायद्या व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची दाट शक्यता असलेल्या पोलीस ठाणे कोराडी येथील 53, कपील नगर 20, यशोधरा नगर 39, नविन कामठी 10, जुनी कामठी 23, जरिपटका 09, खापरखेडा 10, कळमणा 29, पारडी 21 असे एकूण 214 आरोपी यांना 15 दिवस कालावधीत परिमंडळ क्रमांक 05. नागपुर शहर यांच्या अधिकार क्षेत्रात प्रवेश न करण्याबाबत आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. सदरची कार्यवाही मा पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली निकेतन ब. कदम, पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 05 नागपूर शहर यांनी केलेली आहे.