spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

29 सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचे आयोजन

नागपूर :- भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून 29 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याचे हे अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व माजी सैनिक यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे शासनाने निश्चित केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली शौर्य दिनाचा कार्यक्रम माजी सैनिक मुलींचे वसतिगृह, हिस्लाप कॉलेज समोर, सिव्हिल लाईन, नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, शहीद जवानांचे कुटुंबिय यांनी शौर्य दिनाच्या प्रसंगी जास्तीत जास्त संख्येने 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता माजी सैनिक मुलींचे वसतिगृह हिस्लॉप कॉलेज समोर, सिव्हिल लाईन, नागपूर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.

Popular Articles