– जिल्ह्यातील ३३ केव्ही करणवाडी (खापरी) आणि ३३ केव्ही माथार्जून विद्युत उपकेंद्राला आयएसओ मानांकन
यवतमाळ :- जिल्ह्यातील ३३/११ केव्ही करणवाडी (खापरी) आणि ३३/११ केव्ही माथार्जून या दोन्ही विद्युत उपकेंद्राचे अत्यंत उत्कृष्टरित्या सक्षमिकरण आणि नुतणीकरण करण्यात आल्याने जिल्ह्यातील विद्युत उपकेंद्राला प्रथमच ISO:9001:2015 मानांकन मिळाले असून आयएसओ मानकानुसार विद्युत उपकेंद्रात झालेल्या सुधारणेमुळे वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळेल अशी माहिती संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दिली.
महावितरणच्या पांढरकवढा विभागाअंतर्गत करणवाडी (खापरी) उपकेंद्राच्या परिसरात ३३ केव्ही करणवाडी (खापरी) आणि ३३ केव्ही माथार्जून उपकेंद्राला मिळालेल्या आयएसओ मानकाचे प्रमाणपत्र काल (दि. २७) रोजी संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते आणि मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.यावेळी अधीक्षक अभियंता प्रविण दरोली,कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे,संजय खंगार ,शशांक पोंक्षे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, ‘इज ऑफ लिव्हिंग’ अर्थात ग्राहकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. आयएसओ मानकानुसार उपकेंद्रात झालेल्या उत्कृष्ट कामाचा फायदा ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याकरीता होणार आहे.तथापि जिल्ह्यातील या दोन उपकेंद्रापासून प्रेरणा घ्यावी आणि प्रत्येक उपविभात किमान एका उपकेंद्राचे सक्षमिकरण आणि नुतणीकरण आयएसओ मानकानुसार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
वीज ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून महावितरणमध्ये अनेक धोरणात्मक बदल करण्यात आले आहे,नुकताच ५५०० विद्युत सहाय्यकांची पदे भरण्यात आली आहे,या पदभरतीमुळे ग्राहक सेवेला बळ मिळणार आहे.असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

अमरावती परिमंडलातील बडनेरा उपविभागातील ३३ केव्ही लोणी (टाकळी), नंतर आता मारेगाव उपविभागातील ३३ केव्ही करणवाडी(खापरी) आणि झरी जामणी उपविभागातील ३३ केव्ही माथार्जून या तीन विद्युत उपकेंद्राला आयएसओ मानांकन मिळाले असून ही महावितरणसाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी केले,सुत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता श्यामसुंदर कुर्रा आणि आभार उपकार्यकारी अभियंता विनोद मानकर यांनी मानले.








