– 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ग्रंथाबाबत सूचना / हरकती / आक्षेप असल्यास पाठवाव्यात
नवी मुंबई :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या 50 व्या ग्रंथभेट योजनेअंतर्गत सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालकांनी निश्चित केलेल्या नियमावलीनुसार निवड झालेल्या 1 हजार 385 ग्रंथांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ग्रंथाबाबत सूचना / हरकती / आक्षेप असल्यास 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ग्रंथालय संचालनालयाकडे पाठवाव्यात अशी माहिती प्र. ग्रंथालय संचालक यांनी दिली आहे.
नियमावलीनुसार निवड झालेल्या या यादीत मराठी 749, हिंदी 297, इंग्रजी 342 अशा विविध भाषांतील ग्रंथांचा समावेश आहे. ही संपूर्ण यादी www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 26 सप्टेंबर 2025 ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान 25 टक्के सूटदराने वितरीत करणे बंधनकारक आहे.
यादीत समाविष्ट असलेल्या ग्रंथांची नावे, लेखक, प्रकाशक व किंमत याबाबत माहिती स्पष्टपणे दिली आहे. या निवड झालेल्या ग्रंथांच्या यादी संदर्भात कोणाकडेही सूचना / हरकती / आक्षेप असल्यास त्यांनी 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचलनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई – 400 001 यांना लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळेत हस्तबटवडयाने वा पोस्टाने अथवा वर नमुद केलेल्या ई-मेल वर पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त सुचनांचा/हरकतींचा/आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. असे स्पष्ट करण्यात आले आहे. यादीतील ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास अणून दिल्यास स्वागतार्ह असेल, इच्छुकांनी वर दिलेल्या कालावधीत आपली मते व हरकती कळवाव्यात, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक तथा राज्य ग्रंथालय नियोजन समितीची उपसमिती, ग्रंथालय संचालनालय अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.








