तिरोडा :- अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथे 2 आक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांचा जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मेंढे तसेच विशेष अतिथी म्हणून सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सुंदर गीत गायन केले. तसेच मोठ्या संख्येने शाळेचा विद्यार्थिनींनी भाग घेऊन याप्रसंगी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थिनींना याप्रसंगी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेंढे यांनी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी शिक्षक प्रवीण कौंडलकर , कामडी , ढवळे ,उंदिरवाडे शिक्षिका यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.तसेच या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.








