कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड गाव रहिवासी एका तरुणाने कर्जाला कंटाळून राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी 10 वाजता घडली असून मृतक तरुणाचे नाव प्रीतम मोहन ढोणे वय 29 वर्षे रा घोरपड कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाच्या पार्थिवावर पुढील उत्तरीय तपासणी साठी शवविच्छेदनगृहात हलवून अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
फाईल फोटो








