spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाकुने वार करत जावयाला साळ्याकडून जिवे मारण्याचा प्रयत्न

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- जुन्या वादावरून जावयाचा साळ्यांकडुन चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल ३ आॅक्टोबर शुक्रवार रोजी कंरजी येथे घड़ली, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पांढरकवडा येथील शशिकांत गजबे हा वर्धा येथे पोलीस वायरलेस मॅन होते व आरोपी कार्तिक नारनवरे यांचे जावई असून शशिकांत गजबे नेहमी प्रमाणे आपल्या घरून ड्युटीकरिता वर्धेकडे निघाले असता आरोपी कार्तिक नारनवरे रा. पांढरकवडा वय (२९ ) वर्ष मारेगाव येथील न्यायालयात लिपिक पदावर कार्यरत असून तोही आपल्या ड्युटी करिता मारेगाव येथे निघाले असता करंजी येथील उडानपुलासमोर दोघांची अचानक समोरासमोर भेट झाली. यावेळ्यी जुन्या वादातून वाद विवाद सुरू झाले व हा वाद विवाद इतका गंभीर झाला की कार्तिक नारनवरे यांच्याकडून शशिकांत गजबे यांना धारदार चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही मारामारीची घटना पाहत आजुबाजुच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती. या हाणामारीची व हल्ल्याची माहिती पांढरकवडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी वायरलेस मॅन शशिकांत गजबे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कार्तिक नारनवरे यांच्याविरुद्ध कलम ३२४ अंतर्गत विविध कलमान्वये पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल कावरे हे करीत आहे.

Popular Articles