पांढरकवडा :- नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून खेतानी फाउंडेशनच्या वतीने “दांडियाच्या तालावर २०२५” हा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात २७ ते २९ सप्टेंबर या पर्वात माऊली हॉल, पांढरकवडा येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मातृशक्तीकडून मातृशक्तीचा सत्कार, समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या डॉ.प्रा.लीला भेले, डॉ. प्रीती तोटावर, प्रेमा यादव, अनिता गजानन करणेवार, सुवर्णा वरखडे, श्वेता काळपांडे, छाया आगरकर डॉ.मंजुषा कुळकर्णी रिंजेन शामकुवर, गिरीजा त्रिशूलवार, समीक्षा वसंता मडावी, दिया वसंता कुमरे, प्रितीताई झाजरिया, प्रमिला सिडाम अशा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
या उपक्रमातून समाजातील इतर घटकांना प्रेरणा मिळून पुढ़ील काळातही अनेक सत्कार्य घडतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या सोहळ्यात दांडियाच्या रंगतदार तालावर ताल धरत महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. खेतानी फाउंडेशन तर्फे आकर्षक बक्षीसे स्पर्धकांना देण्यात आली. या दांडिया स्पधैसाठी खास नागपूर वखून उत्कृष्ट परीक्षक परीक्षण करण्याकरिता आले होते. ज्यांनी उत्तम सादरीकरणासह योग्य परीक्षण केले. तसेच प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी मनोरंजनासाठी डॉक्टर गुलाटी व मक्या आले. या कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक महिलांनी या स्पर्धामध्ये भाग घेऊन बक्षिसेही मिळवली. यात प्रथम पारितोषिक द वाइब्स या ग्रुपला, दुसरे पारितोषिक महाकाल मंडळ तिसरे पारितोषिक रणरागिणी ग्रुप व दांडिया क्वीन ग्रूप, यांना अनुक्रमें, एक लाख ११ हजार १११, ८८ हजार ८८८, ६६ हजार ६६६ असे भरघोस पारितोषिक देण्यात आले.
ज्या महिलांनी या दांडियात सहभाग घेतला त्या सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच या दांडिया मधून काही खास स्पर्धकांनाही बक्षीस देण्यात आले. सर्वं प्रेक्षकांसाठी स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी होती ज्याचा उपस्थितांनी मनसोक्त लाभ घेतला. तसेच प्रेक्षकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी खेतानी फाउंडेशनने उत्तम नियोजन केले. या सोहळ्यामुळे स्त्रीशत्तीचे महत्त्व अधोरेखित झाले असून सांस्कृतिक परंपरेसोबतच सामाजिक भान जागविण्याचा एक स्तुत्य प्रयत्न खेतानी फाउंडेशनतर्फे करण्यात आला.








