spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘सामना’ हे आता हिंदुत्ववादाचे नव्हे तर पाकिस्तानचे मुखपत्र बनले 

-‘निशान-ए- पाकिस्तान’ पुरस्कार पटकावण्यासाठी राऊतांचा आटापिटा 

– भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई :- पाकिस्तानी सैन्याने भारताला दिलेल्या धमकीची बातमी सामनाच्या पहिल्या पानावर छापण्याचे औचित्य काय आहे? भारताच्या कोणत्याही कोप-यात जाऊन लढण्याची क्षमता व तयारी असल्याची धमकी पाकने भारताला दिल्याची बातमी सामनामध्ये छापण्यात आली आहे. इतर कोणत्याही वर्तमानपत्रात या बातमीला एक कॉलमचेही स्थान दिलेले नाही मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांवर चालणा-या तथाकथित उबाठा गटाच्या मुखपत्र सामना मध्ये पगारी संपादक संजय राऊत यांना मात्र या बातमीला पहिल्या पानावर स्थान द्यावेसे वाटले .सामना हे आता पाकिस्तानचे मुखपत्र झाले आहे. पाकिस्तानचा ‘ निशान-ए- पाकिस्तान’ हा पुरस्कार मिळवण्यासाठी अशा पद्धतीने पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेत भारत विरोधी बातमी देण्याचा राऊतांचा आटापिटा आहे का ? यातून नेमके साध्य काय करायचे आहे? असे खरमरीत सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारताला धमकी देणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या बातमीला पहिल्या पानी स्थान देऊन या बातमीला व्यासपीठ देणे म्हणजे देशद्रोह आहे. भारतीय सैन्याचा अपमान करताना राऊतांना लाज वाटायला हवी असे शरसंधान बन यांनी साधले.

आजपर्यंत “संपलेल्या पक्षावर मी बोलणार नाही” असे म्हणत राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेची नाचक्की करणा-या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत बन म्हणाले की आज अचानक राजप्रेम उफाळून आले आहे. “बात निकलेगी तो दूर तक जायेगी” असे वक्तव्य आज राज ठाकरे यांना उद्देशून केले जातेय. राज ठाकरे यांच्या अंगणात उबाठा गट शरण गेला आहे. खरेतर “मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है” हेच त्यावर खरे उत्तर आहे असेही ते म्हणाले . दोन्ही ठाकरे बंधूंची यदाकदाचित युती जरी झाली तरी मुंबईचा महापौर हा महायुतीचाच आणि मराठीच होणार याचा पुनरुच्चार बन यांनी केला. मराठी माणूस महायुतीसोबत आहे, देवाभाऊंसोबत आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलेल्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल असा विश्वासही व्यक्त केला.

महाविकास आघाडीत बिघाडी निश्चित!

दोन ठाकरे बंधूंची यदाकदाचित युती झाल्यास महाविकास आघाडीत बिघाडी होणार हे निश्चित आहे. ही दिल- दिमाग ची युती नसेल तर भगव्या-हिरव्याची युती असेल असा टोला बन यांनी लगावला. राज ठाकरे यांचे हिंदुत्व काँग्रेसला, पवारांना आणि उद्धव ठाकरेंनाही पचणार नाही. उद्धव ठाकरे सध्या दाढ्या कुरवाळण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार उद्धव ठाकरे यांना पेलणार आहेत का? तसेच राज ठाकरे यांना उबाठा गटाची मुस्लीमधार्जिणी भूमिका रुचणार का ? असे खोचक सवालही त्यांनी केले.

संजय राऊत यांच्याकडून राजकीय आकसापायी नितेश राणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत .मुळात पत्राचाळ घोटाळ्यात 100 दिवस तुरुंगाची हवा खाऊन सध्या जामीनावर मोकाट असणा-या राऊतांनी नितेश राणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे हेच हास्यास्पद आहे असे म्हणत बन यांनी खिल्ली उडवली. सिंधुदुर्ग बँकेच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. राऊतांचे आरोप निखालस खोटे असून त्याला नितेश राणे चोख उत्तर देतीलच असेही बन म्हणाले.

बुरखाधारी उबाठांचा व राऊतांचा बुरखा फाटणार

सक्षम देवाभाऊंवर अकार्यक्षम उबाठांना बोलण्याचा अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासाठी झटत आहेत. मराठवाड्यातील पीडित शेतक-यांच्या पाठीशी भाजपा – महायुती सरकार आणि केंद्र सरकार भक्कमपणे उभे आहे. तातडीने पाहणी करून मदतीसाठी प्रस्ताव या आठवड्यामध्ये दिल्लीला पाठवला जाईल. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रस्ताव मिळताच तातडीने केंद्र सरकारकडून मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे बुरखा आमचा फाटला नाही तर बुरखा घालण्याची सवय जडलेल्या राऊतांचे आणि उबाठा गटाचे बुरखे फाटले आहेत अशी टीका बन यांनी केली. कुठलीही जनहिताची योजना अजिबात बंद पडणार नाही. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्याचे काम महायुती सरकार निश्चितपणे करेल असा विश्वासही बन यांनी व्यक्त केला.

Popular Articles