spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 13 ऑक्टोबरला सत्यपाल महाराजांचे कीर्तन

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सीतानगर बस स्टॉप, एसआरपीएफ कॅम्पच्या बाजूला, हिंगणा रोड येथे 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक जितेंद्र मेश्राम आणि  संगीता मेश्राम असून आयोजन बुद्ध धम्म सेवक संघ, नागपूरतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाला भंते डॉ. शिलवंश महाथेरो, ज्येष्ठ संपादक प्रमोद काळबांडे, डी.आय.सी.सी.आय.अध्यक्ष गोपाल वासनिक, डी.आय.सी.सी.आय. विदर्भ चॅप्टरचे माजी अध्यक्ष विजय सोमकुंवर, डी.आय.सी.सी.आय.विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष राजरत्न मेंढे, मीडिया हेड विनोद मेश्राम, कोर समिती सदस्य श्रद्धानंद गणवीर उपस्थित राहतील. समाजप्रबोधन आणि बौद्ध मूल्यांच्या प्रसाराचा संदेश देणारे हे कीर्तन समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे ठरणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक जितेंद्र ताराचंद मेष्राम यांनी सांगितले की, सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनातून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या बौद्ध तत्त्वांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या बौद्ध समाजात या कार्यक्रमाबद्दल मोठ्या उत्साहाचे वातावरण असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीतर्फे बंडू शंभरकर, राजेंद्र तुरकाने, ॲड. महेंद्र देठे, सुभाष चोरपगार, होमदास पाटील, हरिभाऊ ढोले, बाबाराव धंदर, पिंपळदास लोखंडे, उत्तम पाटील, सूर्यकांत गजभिये, प्रभाकर थूल, अशोक जामगडे, रूपेश लोखंडे, जितेंद्र मेश्राम, तायवाडे, नितेश कांबळे, गौतम नितनवरे, प्रतीक म्हैसकर, भीमराव बिसाद्रे, दामले यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.