सचिन चौरसिया रामटेक ०८ :- महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुणांसाठी युवा कार्य योजनेंतर्गत विविध शासकीय कार्यालयांमध्ये मानधन स्वरूपात पदे भरून सेवा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पदे भरून वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये तरुण युवकांना कार्य देण्यात आले. मात्र काही महिन्यानंतर निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांची अचानक सेवा थांबवण्यात आली. यामुळे अनेक प्रशिक्षणार्थ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले. म्हणून सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांनी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांना वेगवेगळ्या मागणीची निवेदन दिले असून त्यांनी सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा तात्काळ सेवेत घेतले जावे, ज्यांचे मानधन अजूनपर्यंत थकित आहे, ते तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे व कार्य प्रशिक्षणार्थ्यांना ज्या आस्थापनामध्ये आहेत. त्या आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यात यावे. अशी मागणी केली आहे. यावेळी लिनेश नाटकर, शुभम डोंगरे, महेश शेंडे, स्वप्नील बानवरे, प्रभू सलामे यांच्यासह मोठ्या प्रमाणात युवा कार्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.








