नागपूरमध्ये माळी समाजाचा पहिला भव्य वर-वधू-पालक परिचय मेळावा उत्साहात

0
65

– पोट जातीचे बंधन झुगारावेत- सत्यशोधक शंकरराव लिंगे

– शुभमंगलम परिचय पुस्तिकाचे विमोचन

नागपूर :- गीता मंदिर येथील नागपुरात नुकत्याच झालेल्या परिचय मेळावा १२ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे राज्यातील दिवाळी पूर्वीचा पहिला माळी समाजाचा भव्य वर-वधू-पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. या मेळाव्याचे आयोजन अखिल भारतीय माळी महासंघ, नागपूर; क्रांतिज्योती माळी विकास संस्था, नागपूर आणि नागपूर गीता मंदिर वर-वधू-पालक परिचय मेळावा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी “शुभमंगलम् परिचय पुस्तिका” चे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा.माळी समाज शंकरराव लिंगे (सोलापूर) यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद वैराळे, अखिल भारतीय माळी महासंघ आणि विश्वस्त -माळी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखली संपन्न झाला. तसेच मधुसूदन देशमुख, स्वागताध्यक्ष महानगराध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ मेळाव्याचे संयोजक कैलास जामगडे यावेळी उपस्थितीत होते. याप्रसंगी रमेश हिरळकर कार्यकारी अध्यक्ष माळी समाज, अमोल वैराळे, अशोक मानकर, अविनाश ठाकरे, किशोर कन्हेरे, सौ. रोहिणीताई पाटील, पदमाकर भेलकर, प्रेम सातपुते, गणेश मानकर (अमरावती), अँड. नितीन देशमुख, निळकंठराव राऊत, विजय सोनुले, अनिल वर्हेकर (वरुड), विठ्ठल तोडकर (विश्वस्त), गौतम क्षीरसागर (विश्वस्त), शिवशंकर कौलकर (विश्वस्त), आदी मान्यवर प्रमुख उपस्थिती होते. मेळाव्यात सुमारे १५०० युवक-युवती आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसह विविध राज्या मधील माळी समाज बांधवांनी उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराम गुरनुले, अंबादास गाडेकर, गोविंद तितर, विजय सातोकर, अशोक बनसोड, संजय साखळे, डॉ. विवेक भुसारी, नरेंद्र चिचमलकर, अनिल भेदे, अरुण ढाकुलकर, शंकर चिमोटे, प्रदीप मांदाडे, नामदेव लांजेवार, नंदकिशोर पाचपोर, प्रभाकर कळसकर, सुभाष लांजेवार, योगेश्वर सोनुले, बाळकृष्ण येनकर आणि नामदेव लांजेवार, पत्रकार आघाडीचे देवराव प्रधान आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेत. शेवटी आभार सचिव शिवराम गुरुनुले यांनी मानले. महिला आघाडीच्या वृषाली ओम वैराळे, गायत्री भुसारी, पुष्पा बनकर, दिपाली अनिल भेदे, स्नेहा संजय साखळे, लता सुभाष लांजेवार, वर्षा नरेंद्र चिचमलकर, मंगला बाळकृष्ण येनकर आणि वंदना गणेश कडुकर आदी महिला कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. हा मेळावा सामाजिक बांधिलकी, एकता आणि विवाहसंस्थेतील सुसंवाद वाढवण्याचा एक सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला.