हावेस्टर ट्रॅक्टर ट्रॉली व झायलो गाडीचा अपघात अपघात एकाचा जागीच मृत्यू तर एक कोमात

0
62

तिरोडा :- तालुक्यातील सर्रा वडेगाव मार्गावर हार्वेस्टर हार्वेस्टर ट्रॅक्टर ट्रॉली व झायलो गाडीच्या अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या दरम्यान घडली आहे सविस्तर वृत्त असे की सर्रा वरून वडेगाव कडे येणाऱ्या हार्वेस्टर ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक MH 36 JG च्या मागील पार्ट टुटल्याने नियंत्रण सुटला. मागेवरून येणारी झायलो चार चाकी गाडी क्रमांक MH 33 A 3713 यात ट्रॅक्टरवर आदळली त्यात ट्रॅक्टर टॅली येथील सागर गुरुबैले राहणार किसनपुर वय वर्ष 23 यांचाजागीच मृत्यू झाला.याच ट्रॅक्टर वरील चालक चिंटू बिसेन वय 22 वर्ष राहणार किसनपुर हा कोमात गेला आहे . त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.झायलो गाडी ही आरमोरी येथील असल्याची माहिती मिळत आहे . तर ट्रॅक्टर किसनपुर येथील आहे. झायलो गाडीवरील 5 ते 6 असलेले प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळत आहे.घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना देण्यात आली आहे .मृतक सागर गुरुबैले चे शव शवविच्छेदनाकरीता उपजिल्हा रुग्णालयात तिरोडा येथे नेण्यात आले असून पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत.