spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पीएम श्री शाळा दहेगाव येथे दिपावली सुट्टीच्या कालावधीत नवोदय सराव वर्ग 

किशोर साहू, मौदा ,ता २५:- मिशन नवोदय हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी पं.स.मौदा संकेत मरसकोल्हे यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे.मिशन नवोदय या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जरी सुट्टी असली तरी या सुट्टीच्या कालावधीत नवोदय परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव मिळावा या उद्देशाने पी एम सी जिल्हा परिषद उच्च शाळा प्राथमिक दहेगाव येथे नवोदय सराव वर्ग घेण्यात येत आहेत.यापूर्वी सुध्दा विद्यार्थ्यांचे सराव पेपर घेण्यात आले आहेत.या सराव वर्गाचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले.

दिपावली सुट्टीच्या कालावधीत नवोदय सराव वर्ग शाळेतील शिक्षकवृंद सुधीर कांबळे, सुधीर खंडाईत, लिलाधर कांळबांधे, राजेश रोहाड, सुजाता बोदेले, प्रज्ञा रामटेके, संगीता कारेमोरे यांनी सर्वांनी सहकार्य करुन मिशन नवोदय सराव वर्ग हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Popular Articles