spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विभागात सर्वत्र समाधानकारक पाऊस चोवीस तासात 73.3 मीमी पावसाची नोंद भंडारा, गोंदिया, नागपूर व गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

 नागपूर, ०९  : विभागात मागिल चोवीस तासापासून समाधानकारक पाऊस सुरू असून मागिल चोवीस तासात 73.3 मीमी पावसाची नोंद झाली आहे. विभागात 165.8 मीमी म्हणजेच 45.8 टक्के प्रत्यक्ष पाऊस झाला आहे. सर्वाधिक भंडारा जिल्ह्यात 114.5 मीमी, गोंदिया 116.4 मीमी तर नागपूर जिल्ह्यात 77.9 मीमी पावसाची नोंद झाली आहे.

मागिल चोवीस तासापासून विभागात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक तालुक्यात भिवापूर 118.6, मौदा 100.3 मीमी, , रामटेक 107, काटोल 100.3, पारशिवनी 99.9, कामठी 88.8, कुही 98.2, उमरेड 80.8, नागपूर (शहर) 67.8, नागपूर (ग्रामीण) 64.7, सावनेर 65.2, कळमेश्वर 68.7, हिंगणा 57.5, काटोल 43.8, नरखेड 53.6 मीमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 148.9 मीमी म्हणजेच 48.9 टक्के पाऊस पडला आहे.

भंडारा जिल्ह्यात मागिल चोवीस तासात 114.5 मीमी पाऊस पडला असून लाखांदूर तालूक्यात 164.7 मीमी, पवनी 155.1 मीमी, तुमसर 147.6, मोहाडी 99.3, लाखनी 83.6, साकोली 75.2 व भंडारा तालुक्यात 69.4 मीमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यत 215.6 मीमी म्हणजेच 56.4 टक्के पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील चोवीस तासात 116.4 मीमी पावसाची नोंद झाली असून यामध्ये देवळी तालुक्यात 226.5 मीमी, मोरगाव अर्जुनी 206.9, तिरोडा 120, गोंदिया 79.2, सडक अर्जुनी 74.2, सालेकसा 75.7, आमगाव 53.2, गोरेगाव 59.2 मीमी. जिल्ह्यात आतापर्यंत 236.7 मीमी म्हणजेच 57 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मागिल चोवीस तासात 49.8 टक्के नोंद झाली असून सर्वाधिक ब्रम्हपूरी तालुक्यात 162.8, नागभिड 152.4, चिमूर 75.8 मीमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण 143.4 मीमी म्हणजेच 40.1 टक्के नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील चोवीस तासात 69 मीमी नोंद झाली असून आतापर्यंत 237.1 मीमी म्हणजेच 75.4 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस वडसा देसाईगंज तालुक्यात 169.6 मीमी, कोरची 167.4 मीमी, धानोरा 110.6, आरमोरी 126.2, कुरखेडा 133.5 तर गडचिरोली तालुक्यात 74.3 मीमी पाऊस पडला. वर्धा जिल्ह्यात मागील चोवीस तासात 38.3 मीमी पाऊस पडला असून जिल्ह्यात एकूण 68.2 मीमी म्हणजेच 24.9 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

 अतिवृष्टीमूळे 284 घरांचे अशंत: नुकसान

अतिवृष्टी व पूरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील शेततळ्यात बुडून 2 व्यक्ती मृत झाले आहेत. तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील अतिवृष्टीमुळे झाड पडून एक व्यक्ती मृत झाला आहे. विभागात अतिवृष्टीमूळे 12 घरांची पूर्णत: तर 284 घरांची अशंत: नुकसान झाले आहेत. तसेच 41 गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमूळ झालेल्या घरांच्या नुकसानीमध्ये भंडारा जिल्ह्यातील 4 पूर्ण तर 34 अशंत:, गोंदिया जिल्ह्यातील 6 पूर्ण तर 77 अंशत:, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 अशंत: तर 24 पूर्ण तर गडचिरोली जिल्ह्यातील 2 पूर्ण तर 143 घरांचे अशंत: नुकसान झाले आहे.

@filephoto


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.