spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अरहम ॲनिमल ॲम्ब्यूलन्स’ सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर :- राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब जी यांच्या दिव्य आशीर्वादाने ‘अरहम ॲनिमल ॲम्ब्यूलन्स’ सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. रामगिरी निवासस्थान येथे हा सोहळा झाला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत आपण केवळ माणसांचा नव्हे, तर सर्व प्राणीमात्रांचा विचार करतो. सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार आहे.याच सेवाभाव आणि करुणेच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाची सुरुवात होत आहे. ॲनिमल केअर हॉस्पिटलसाठी जागेची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सकारात्मक विचार करू असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

‘अरहम ॲनिमल ॲम्ब्युलन्स’सेवेशी जोडलेले राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज जी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आभार मानले.

Popular Articles