spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजोली येथे आजपासून दोन दिवसीय मंडई उत्सवाला सुरुवात 

किशोर साहू, मौदा ,ता. २७:- दरवर्षीप्रमाणे यंदाही नवयुवक सांस्कृतिक मंडई महोत्सव मंडळ राजोली यांच्या सौजन्याने उद्या सोमवार( दि. 27 ऑक्टोबर) पासून दोन दिवसीय मंडईला सुरुवात होत आहे. सोमवारला रात्री आठ वाजता बाजार चौकातील भव्य प्रांगणात बालगंधर्व नाट्य रंगभूमी देसाईगंज वडसा यांच्या संगीतमय ओझा कर्जाच्या या तीन अंकीय नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. मंगळवार( दि.28 ऑक्टोबर)ला जनजागृती कलंगी मंडळ रेवराल शाहीर अतुल भाऊ रामकृष्ण यांच्या सकाळी दहा वाजता पासून सायंकाळपर्यंत खडा तमाशा, रात्री आठ वाजता खास रसिकांच्या आग्रहास्तव रिंकी अँड ग्रुप प्रस्तुत कोल्हापूरच्या झिंगाट या मराठमोडी लावण्यांच्या कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री गडचिरोली एडवोकेट आशिष जयस्वाल,

प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल, माजी पंचायत समिती सभापती स्वप्निल श्रावणकर, मनोज कोठे , ग्रामपंचायत राजोली प्रभारी सरपंच योगेश महादुले, खात रेवराल जिल्हा परिषद सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर तांबुलकर,श्रीहरी थोटे, माजी सरपंच परमधमय्या मैनेनी,तंटामुक्त समिती अध्यक्ष विलास आंबीलढूके, उपाध्यक्ष राजू श्रावणकर , कॉन्ट्रॅक्टर तारसा मुकेश हटेवार,

ग्रामपंचायत सदस्यगण काशिनाथ पोटभरे ,रूपचंद आंबीलढूके, अर्चना वानखेडे, भूमेश्वरी गिरी, बबीता जांभुळकर, मीना तांडेकर सह देवस्थान समिती , तंटामुक्ती समिती, बांधकाम समिती , परमात्मा एक समिती चे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

तरी या भव्य सांस्कृतिक मंडई महोत्सवाच्या लाभ घेण्याचे आव्हान नवयुवक सांस्कृतिक मंडई महोत्सव मंडळाचे अध्यक्ष रवी वानखेडे, उपाध्यक्ष रवी पोटभरे, सचिव चेतन आंबील ढूके ,सहसचिव वैभव श्रावणकर, कोषाध्यक्ष अजय श्रावणकर सह समस्त सदस्यगणांनी केले आहे व समस्त ग्रामवासी सहकार्य करत आहेत.

Popular Articles