spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

३१ डिसेंबरपर्यंत  ऑनलाईन कर भरणाऱ्यांना मिळणार १० टक्के सूट

 

नागपूर, ०९ : नागपूर महानगरपालिकेने ऑनलाईन कर सवलतीच्या पहिल्या मोहिमेला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आता महानगरपालिकेने कर सवलतीची मोहिम ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता या मुदतीपर्यंत चालू आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना १० टक्के तर ऑफलाईन करदात्यांना ५ टक्के सवलतीचा लाभ दिली जाणार आहे.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वात व उपायुक्त  मिलिंद मेश्राम यांच्या देखरेखीत १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या काळात ऑनलाईन कर भरणाऱ्यांना १५ टक्के सवलत देण्यात आली. तर ऑफलाईन मालमत्ता कर अदा करणाऱ्या करदात्यांना १० टक्के सवलत देण्यात आली. या अभियानामुळे महानगरपालिकेच्या कर वसुलीमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही सवलत शिक्षण कर, रोजगार हमी कर आणि मोठ्या निवासी इमारतीवरील कर यावर लागू होणार नाही.

करदात्यांनी दिलेल्या प्रतिसाद पाहून महानगरपालिकेने आता ही कर सवलत येत्या ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात ऑनलाईन कर अदा करणाऱ्या करदात्यांना १० टक्के सवलतीचा लाभ होणार आहे. करदात्यांनी महानरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या सवलतीचा लाभ घ्यावा, तसेच करदाते व्हाट्सअॅप चॅटबॉटद्वारे ७३९७८०७३९७ या मोबाईल क्रमांकाचा उपयोग कर भरण्यासाठी केला जाऊ शकतो.

@filephoto

Popular Articles