किशोर साहू, मौदा ,ता.८:- दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर गट ग्रामपंचायत गांगनेर (हिवरा) अंतर्गत येणाऱ्या हिवरा ( गांगनेर) येथील सार्वजनिक हनुमान मंदिर येथे बुधवार (दि .५ नोव्हेंबर) ला दहिकाल्याचा कार्यक्रम पार पडला . याप्रसंगी उपसरपंच मोतिराम घरजाळे, पोलिस पाटील श्रिकृष्णा कुथे, अंबादास हारोडे , संजय कुथे ,मनोहर कुथे , मोरेश्वर कुथे ,नरेश कुथे, विलास हारोडे , पवन खंडाईत सह गावातील समस्थ गावकरी उपस्थीत होते.








