spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

क्रीडा क्षेत्रात लोकमान्य विद्यालय, बडेगावची उत्तुंग भरारी

खापा :- गुमथळा तालुका कामठी येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १४ वर्षे वयोगटामध्ये लोकमान्य विद्यालयाचा मुलींचा संघाने जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. संघामध्ये अलिशा मालाधारी, वंशिका शेंडे, मनस्वी सायरे, गुंजन सोमकुवर, काजल गोडबोले, कल्याणी देहारे, ओमेश्री नस्कोल, ईश्वरी बागडे व सलोनी परतेकी यांचा समावेश होता. विजेत्या खेळाडूंचे लोकमान्य शिक्षण संस्थेचे पदाधिकारी दिलीप चचाने, रामराव बट्ठे, अनिल बागडे, मनोहर पाल, वीरेंद्र निंबार्ते, किशोर बागडे तसेच मुख्याध्यापक गजानन कुरवाडे, क्रीडा शिक्षक सुरेंद्र बनसिंगे, शिक्षक नितीन निरगुडे, दिलीप इंगोले, विजय गिरी, सचिन कुंथे, शिक्षिका वर्षा ठाकरे, जया हुमणे, लिपिक जितेंद्रपुरी गोसाई, शिपाई हरीपाल बागडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Popular Articles