spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर जिल्ह्यात सराफा व्यापाऱ्याला लाखोंचा चुना! विनोद सोयाम’ टोळीचा कारनामा उघडकीस वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात सराफा व्यापाऱ्याची तब्बल ८१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्तुळात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील सराफा व्यापारी अक्षय अमरचंद सोनी यांना “सोने विकायचे आहे” असा विश्वास संपादन करून सचिन डोंगरे आणि विनोद सोयाम या दोघांनी जाळ्यात ओढले.४ नोव्हेंबर रोजी सचिन डोंगरेने सोनी यांना सोन्याचा तुकडा दाखवत सांगितले की, “हे सोने माझा मित्र विनोद सोयाम याला विक्री करायचा आहे असे सांगत ” विश्वासात घेतले त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी सोनी यांना वरोरा येथे बोलावण्यात आले.

तेथे विनोद सोयामने ८१ लाख ५० हजार रुपये घेऊन ‘सोने आणतो’ असे सांगून घरातून निघून गेला. मात्र तो परत आला नाही!

पुढच्याच दिवशी सोयामने पुन्हा संपर्क साधून सांगितले  “सोने नागपुरात देतो, तिकडे ये.”पण सोनी नागपूरला पोहोचले तरी, सोयाम पुन्हा गायब! होता

त्यानंतर सोनी यांना समजले की त्यांची सरळसरळ फसवणूक झाली आहे.या प्रकरणी सोनी यांनी वरोरा पोलीस ठाण्यात विनोद सोयाम आणि सचिन डोंगरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी फसवणुकीचे विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

सोयाम वर आधीही अनेक फसवणुकीचे आरोप*!

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे  विनोद सोयाम हा जिल्ह्यातील अनेक नागरिकांची विविध व्यवहारांच्या आमिषाने फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. सोयाम मुळे यापूर्वीही अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

पोलिसांचे आवाहन*

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,“विनोद सोयाम किंवा त्याच्या साथीदारांकडून कोणी फसवले गेले असल्यास त्वरित पुढे येऊन तक्रार द्यावी.”

Popular Articles