spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

किरण कोरडे यांची महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड

यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पश्चिम विभागची बैठक शेगाव येथील माहेश्रवरी भवन येथे दिनांक ९/११/२०२५ रविवार रोजी संपन्न झाली.या बैठकीत प. विदर्भ पदाधिकारी ची निवड करण्यात आली.त्यात प्रामुख्याने यवतमाळ येथील किरण कोरडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सघटन सचिव म्हणून अकोट येथील प्रकाश आमले व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून बुलढाणा येथील राजेंद्र टीकार यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी सदस्य म्हणून प्रकाश उन्हाळे शेगाव, गणेश लोणकर अकोट, अशोक शिंदे यवतमाळ, यांची निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांनी काम पाहिले.यावेळी उपाध्यक्ष संतोष शिरभाते यवतमाळ, शेगाव येथील प्रकाश उन्हाळे, संजय स्वामी, नारायण ठोसरे, कल्पेश भालेराव, राजेश तायडे व इतर सदस्य गन, यावेळी उपस्थित होते.

Popular Articles