spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्रीहरी नगर जेष्ठ नागरिक मंडळातर्फे शेगाव दर्शन सहल

नागपूर :- श्रीहरी नगर जेष्ठ नागरिक मंडळा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहलीला 10 नोव्हेंबर रोजी श्रीहरी नगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे सर्व प्रथम भक्तमंडळीनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. उत्तम अशा प्रकारच्या भोजनाची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती. त्याच दिवशी आम्ही शेगावसाठी प्रस्थान केले. येथील श्री. संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांचे सर्व भक्तमंडळींना छान, व्यवस्थित दर्शन घेता आले. त्यानंतर सर्वांनी प्रसादालयात भोजन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 नोव्हेंबर रोजी सगळ्या भक्तांनी शेगावला नाश्ता करून सिद्धपीठ (बाळापुर) येथील लक्ष्मी मंदिर, ज्योतिर्लिंग व इतर देव-देवतांचे दर्शन घेतले.

नागपूरला येतांना तिवसा येथे मेहर भोजनालयमध्ये जेवण केले. हॉटेल मालकांनी उत्कृष्ट, उत्तम व स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली होती. सर्व भक्तमंडळींनी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला.

या सहलीसाठी जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर यांनी विनामूल्य बस देऊन सहकार्य केले. प्रतिष्ठान तर्फे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. राजीव मिश्रा (सचिव) यांच्या सहकार्याबाबत आम्ही सर्व भक्तमंडळीं त्यांचें आभारी आहोत. सहल यशस्वी करण्यासाठी श्रीहरी नगर जेष्ठ नागरिक मंडळातील पदाधिकारी सुरेशराव उरकुडे, विठ्ठलरावजी घोडे, डॉ. अशोक मंदे, नामदेवराव खाटके, सुरज भानसिंग, कैलास उरकुडे, प्रवीण सुरकर, हरीश लाकडे, डॉक्टर गौर, डॉ. काळे व सर्व भक्तमंडळींचे सहकार्य लाभले.

Popular Articles