spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा न.प.निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

खापा :- खापा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनने तयारी सुरू केली आहे. शांततापूर्वक आणि सुव्यवस्थेत निवडणुकीचे आयोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूक अधिकारी व तहसीलदार स्नेहलता पाटील यांना मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकारी किरण बगडे यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात निवडणुकीच्या प्रत्येक प्रक्रियेची नियोजित वेळापत्रकानुसार तयारी सुरू केली आहे. नगरपरिषद कार्यालय सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना वेळापत्रक आचारसंहिता, प्रशासन व्यवस्थेची, निवडणूक कार्यक्रम व निवडणूक प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली.

“खाप्यात २० केंद्रांवर होणार मतदान”

खापा नगरपरिषदेच्या नगरसेवक व नगराध्यक्ष निवडणुकीचे मतदान २ डिसेंबरला होणार आहे. खापा येथे एकूण १० प्रभाग असून २० नगरसेवक निवडून येतील. नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या निवडणुकीसाठी २० केंद्रांवर मतदान करण्यात येणार आहे. मतदार यादीनुसार एकूण मतदार संख्या १३ हजार ३५३ आहे. त्यामध्ये महिला मतदारांची संख्या ६ हजार ८४० व पुरुष मतदार ६ हजार ५१३ आहेत.

तसेच मतदान केंद्र व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी नगर परिषद कार्यालय खापा येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. दिनांक १०/११/२०२५ पासून उमेदवारी अर्ज भरण्याची व निवडणुकीचा अनुषंगाने सर्व प्रक्रिया ही नगर परिषद खापा कार्यालयाच्या इमारतीमध्ये होणार आहे. तसेच मतमोजणी ही नवीन वस्ती येथील सामुदायिक भवन हॉल मध्ये होणार आहे. मतदार यादीमध्ये दुबार मतदाराची संख्या नमूद असून त्यांना आपल्या पसंती नुसार मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी बिएलओ यांना सहकार्य करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आवाहन केलेले आहे.

Popular Articles