नागपूर :- खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूर द्वारे रविवार 16 नोव्हेंबर रोजी, कुसुमताई वानखेडे सभागृह धरमपेठ येथे चौथा राज्यस्तरीय उपवर – उपवधू परिचय मेळावा व स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला उद्घाटक म्हणून कुणबी धर्मशाळा रामटेकचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य भगवंतराव रडके राहणार आहे. विशेष अतिथी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास ठाकरे तसेच वरोरा येथील आमदार करण देवतळे उपस्थित राहणार आहे . कार्यक्रमाचे अध्यक्ष कामठीचे डॉ. महेश महाजन यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दिनदर्शिका व परिचय पुस्तकाचे प्रकाशन होईल. या सोहळ्याला वरदान बिल्डकॉन चे संचालक निलेश महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. राज्यस्तरीय उपवर वधू परिचय मेळावा व नेहमीलन 16 मोठ्या प्रमाणात समाज सोहळ्याला समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य प्रमुख संघटक महादेव वैद्य अध्यक्ष मनोहर डंबारे सचिव सुनील मगरे उपाध्यक्ष नाना शेंडे राजेश पिपळे व कोषाध्यक्ष राजेंद्र महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.








