spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एज्युकेशन पॉईंट पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून जनजागृती

खापा :- घटनेने देशाच्या नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून आपण ते बजावलेच पाहिजे, या विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी (दि. १२ नोव्हे.) बुधवारला एज्युकेशन पॉईंट पब्लिक स्कूल नवीन वस्ती खापाद्वारे नविन वस्ती येथे मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली.

नगरपरिषद खापा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियान अंतर्गत तहसीलदार तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहलता पाटील आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी किरण बगडे व शाळेचे मुख्याध्यापक चेतना पराते यांच्या मार्गदर्शनात रॅली काढण्यात आली.

विद्यार्थ्यांनी ‘मतदान करा’ अशा घोषणा दिल्या. ‘मतदान करा’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या जनजागृतीच्या कार्यक्रमात शाळेचे क्लर्क मेहेंद्र काळे, राधिका गोडबोले, भावना चौरिवार, अर्चना निमजे, कल्पना धांदे, मंगला खुबाळकर, पल्लवी खुबाळकर, सरला बावनकुळे, हर्षिता खंते यांच्यासह शालेय पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रैलीचे आयोजन नगर परिषद खापाचे सिटी कोऑर्डिनेटर राहुल बावनकुळे, प्रकल्प अधिकारी प्रमोद लकड़कर, शिक्षक प्रतिनिधी वाहने, गोदरेज फीडबैक फाऊंडेशन चैरिटेबल ट्रस्टचे प्रोजेक्ट मैनेजर जितेंद्र पासवान, कर्मचारी सुरक्षा तितरे, प्रदीप रेवतकर, सेजल धनोरे, मीनाक्षी पराते, हर्षा पौनीकर, पूजा इटणकर यांच्या सहकार्याने करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी मतदान करा या अभियानास उत्तम प्रतिसाद दिला.

Popular Articles