spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या स्तन कर्करोग तपासणी शिबिरांना उत्तम प्रतिसाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने मनपा आरोग्य विभागातर्फे एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूर आणि रोटरी क्लब नागपूर नॉर्थच्या सहकार्याने महिलांकरिता आयोजित निःशुल्क स्तन कर्करोग तपासणी शिबिरांना महिलांनी उतम प्रतिसाद दर्शविला.

‘दहा दिवसीय शिबिरात विविध झोनच्या शेकडो महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे गुरुवारी (ता.१३) गांधीबाग झोन येथील महाल लाकडी पूल आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्रांवर समापन झाले. शिबिराला आमदार प्रवीण दटके यांचे मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय तिवारी, एचसीजी रुग्णालयाचे डॉ. सोनम शाहू, डॉ. कमलजीत कौर, यांच्यासह महर्षि कर्वे नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना अंतर्गत मनपाच्या दहाही झोनस्तरावर हे शिबिर आयोजित करण्यात आले. मामहाल लाकडी पूल आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्रांवर झालेल्या शिबिरात १३१ महिलांनी नोंदणी केली. तर १०३ महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ७ महिला स्तन कर्करोगाच्य संशयित आढळल्या. यातील एका महिलेला एचसीजी रुग्णालयाकडे पाठविण्यात आले.

Popular Articles