किशोर साहू, मौदा, ता. १४ :- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली स्पर्धा उपक्रम, प्रदर्शनी, कार्यशाळा, क्षेत्रभेट, परसबाग अशा प्रकारच्या विविध बाबींबाबत नवनवीन उपक्रम कृतीयुक्त पद्धतीने राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यास शाळेतील मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे तसेच सहशिक्षक निलेश जाधव प्रयत्नशील असतात. यावर्षी तालुकास्तरिय अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धा पंचायत समिती मौदा येथे पार पडल्या.

यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलीचे सहशिक्षक निलेश जाधव यांनी गोळा फेक या स्पर्धेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली कौतुकास पात्र ठरली.








