spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलीत बालदिन साजरा 

किशोर साहू, मौदा ,ता. १६ :- माजी पंतप्रधान व बालकांचे लाडके पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती जि प शाळा तोंडली येथे बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या फोटोला नमन करून, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. महापुरुषांकडून समाज सुधारण्यासाठी, देशासाठी, विज्ञानासाठी, शिक्षणासाठी महान कार्य कशाप्रकारे घडून आले.त्यातून आपण कसे प्रगत होत गेलो. यासंबंधीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी महापुरुष जयंती साजरा करणे हा उपक्रम राबवला जातो. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास समाजाबद्दल ची आपली जबाबदारी ची जाणीव निर्माण व्हावी यासाठी महापुरुषांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला जातो.प्रत्येक महापुरुषाने निष्ठा, परिश्रम, प्रामाणिकपणा, धैर्य, सेवा, त्याग असे महान मूल्य दिले आहेत. जयंतीद्वारे ही मूल्ये मुलांपर्यंत पोहोचतात.

महापुरुषांच्या जयंती साजरा करणे या उपक्रमांतर्गत भारताचे माजी पंतप्रधान व बालकांचे लाडके पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे साजरा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून चाचा नेहरू च्या जीवनपटावर प्रकाश टाकला. भाषणे,गीत गायन व जीवनात काहीतरी चांगले घडवून दाखवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. या बालवयातच बालमनाचा संकल्प पाहून शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे तसेच सहशिक्षक निलेश जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Popular Articles