खापा :- खापा येथे होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदात्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने नगरपरिषद राजेंद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांन द्वारे शनिवार दि. १५ रोजी मतदान जनजागृती अभियान अंतर्गत बाजार चौक, माताखेडी, नगरपरिषद कार्यालय, परिसरात जनजागृती अभियान राबविण्यात आले.
भारतीय संविधानाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून आपण ते बजावले पाहिजे. या विचाराचा प्रसार व प्रचार करण्यात आला. चौका चौकात पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्नेहलता पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी किरण बगडे, प्रशासकीय अधिकारी वैभव गोळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नेहारे यांच्या मार्गदर्शनात मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक शामराव खडसे, शिक्षक असलम खान, नीता चामाटे, सुनील हेडाऊ, इमरान खान, नम्रता मडके, प्रतिभा खुब्रागडे, सोनाली मानकर, सुनील गाडीगोणे, युवराज तायवाडे, प्रवीण मेश्राम यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मतदानाचे महत्त्व सांगण्यासाठी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी नगरपरिषद खापाचे शहर समन्वयक राहुल बावनकुळे, प्रकल्प अधिकारी प्रमोद लकडकर, केंद्रप्रमुख मुकेश वहाने, गोदरेज फीडबैक फाऊंडेशन चैरिटेबल ट्रस्टचे प्रोजेक्ट मैनेजर जितेंद्र पासवान, प्रदीप रेवतकर, मीनाक्षी पराते, हर्षा पौणीकर, प्रकाश कोल्हे, दिवाकर बारापात्रे यांनी सहकार्य केले.
१२ नोव्हें. रोजी एज्युकेशन पॉईंट पब्लिक स्कूल नविन वस्ती, १३ नोव्हें. रोजी जवाहर हायस्कूल, १५ नोव्हें. रोजी आदर्श प्राथमिक स्कूल, १७ नोव्हें. रोजी गांधी प्राथमिक स्कूल, १८ नोव्हें. रोजी राष्ट्रीय उच्च प्राथमिक स्कूल, २२ नोव्हें. रोजी कस्तुरबा प्राथमिक स्कूल, २२ नोव्हें. रोजी जिजामाता प्राथमिक स्कूल, २४ नोव्हें. रोजी राष्ट्रीय प्राथमिक स्कूल गुनगाव माईन, २६ नोव्हें. रोजी जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे खापा शहरात विविध प्रभागात मतदार जनजागृती करण्यात येणार आहे.









