पांढरकवडा :- आर्थिक अडचणींवर मात करत ताडउमरी येथील वैभव सुनील गवळी या तरुणाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. शेतकरी वडिलांचा मुलगा असलेला वैभव ग्रामीण भागातून येऊनही कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. वैभवने आपले प्राथमिक शिक्षण ताडउमरी गावातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले.
वैभवच्या या यशामागे त्याचे वडील सुनिल गवळी, आई, आजी, आजोबा, काका, काकू यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले. या यशामुळे ताडउमरी आणि परिसरात आनंदाचे वातावरण असून, ताडउमरी येथील सरपंच मिथुन मडावी यांनी वैभव व त्यांच्या परीवाराचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्याला पांढरकवडा पोलीस स्टेशन ठाणेदार दिनेश झांबरे, गट शिक्षणाधिकारी गंधे, ग्रामसेवक प्रकाश काकडे, राम सिंघानिया (सी.ए) श्रीकांत वातिले (सामाजिक कार्यकर्ता) हरि कूड़मेथे (सरपंच ग्रा.पं. कोठोडा) महेश आदेवार (उपसरपंच) सुनिल तूलजेवार, विलास चांदूरकर, नागोरावजी राऊत (पोलिस पाटील) ग्रा. पं. सदस्या नम्रता चौधरी, लता मड़ावी, ग्रा. पं. कर्मचारी राज गेडाम व समस्त ग्रामवासी ताडउमरी यांचा उपस्थित सत्कार समारंभ पार पडला.
“ग्रामीण भागात राहूनही कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास असेल, तर कोणतेही स्वप्न साकार करता येते,”असे वैभवने आपल्या यशाबद्दल बोलताना सांगितले




