– शिवसेना तालुकाप्रमुख तथा मौदा तालुका संजय गांधी व श्रावणबाळ योजना सदस्य प्रशांत भुरे यांच्या प्रयत्नांना यश
किशोर साहू :मौदा ,ता.१८:- अरोली परिसरातील शेतकऱ्यांना शेतात पावसाळ्यात जाण्या येण्याकरिता पांधण रस्त्याचे खडीकरण होणे अत्यंत आवश्यक असल्याने, याबाबत तालुका शिवसेनाप्रमुख तथा मौदा तालुका संजय गांधी व श्रावण बाळ योजना सदस्य प्रशांत भुरे यांनी अरोली सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांनी दिलेल्या संबंधित रस्त्यांचे निवेदने व ठरावाची प्रत घेऊन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. भुरे यांच्या प्रयत्नाला यश येऊन अखेर राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी अरोली परिसरातील पांधण रस्त्याच्या खडीकरणासाठी भरघोष निधी मंजूर केला.
पांदण रस्ते खडी करण्यासाठी निधी मंजूर केलेल्या रस्त्यांमध्ये भारत गॅस गोडाऊन ते धोंडबा झिंगरे यांच्या शेतापर्यंत, स्मशान घाट अरोली ते बबन बावनकुळे यांच्या शेतापर्यंत, योगेश देशमुख ते प्रभाकर सोनटक्के यांच्या शेतापर्यंत, सामदेव समरीत ते नामदेव समरीत यांच्या शेतापर्यंत, सुब्बाराव गल्ला ते शंकर श्रावणकर यांच्या शेतापर्यंत ,भारत गॅस गोडाऊन ते भांडेवाडी रोड पर्यंत, रुपेश यावलकर ते जगदीश निमकर यांच्या शेतापर्यंत, बेरडेपार रोड ते राधेश्याम मेहर यांच्या शेतापर्यंत, अरोली टोली ते पारडी कला रस्त्यापर्यंत या नऊ रस्त्यांच्या समावेश आहे. संबंधित रस्त्यावर आवागमन करणाऱ्या शेतकरी व नागरिकांनी राज्यमंत्री ॲड .आशिष जयस्वाल ,सरपंचा रोशनी प्रशांत भुरे, मौदा तालुका शिवसेनाप्रमुख तथा संजय गांधी व श्रावण बाळ योजना सदस्य प्रशांत भुरे यांचे आभार मानले आहे.








