चंद्रपूर :- जिल्ह्यातील मानव–वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. वाघ, बिबट्या, अस्वल यांची मानवी वस्त्यांमध्ये उपस्थिती आता नेहमीची बाब बनत असताना, वन्यजीव गावांमध्ये शिरकाव करण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशाच एका धक्कादायक घटनेंनी सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहाटेचा थरार : सुंदर जुमनाके यांच्या घरात अस्वलाचा प्रवेश
डोंगरगाव येथील नागरिक सुंदर जुमनाके यांच्या घरात पहाटेच्या सुमारास अचानक एक अस्वल घरात घुसले अचानक हालचाल ऐकू येताच कुटुंबीयांना काहीतरी अनैसर्गिक घडल्याची जाणीव झाली.अस्वल घरात असल्याचे लक्षात येताच, कुटुंबातील सर्व सदस्यांनी शांतता राखत तातडीने घराबाहेर पडून दार बंद केले, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
वनविभाग व पोलीस तातडीने पोहोचले
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
कर्मचारी अस्वलाला कोणतीही हानी न पोहोचवता सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवले
अस्वल घराच्या आतील भागात लपून बसल्याने मोहीम अधिक काळजीपूर्वक करण्याची आवाहन वन विभागासमोर होते पार
गावात प्रचंड गर्दी; प्रशासन पंचाईत
अस्वल घरात शिरल्याची बातमी वेगाने पसरताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.स्थानिकांमध्ये भीती आणि कुतूहल यांची मिश्र प्रतिक्रिया दिसून आली.गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा वर्तुळे तयार करून परिसर बंदिस्त केला होते
वाढता मानव–वन्यजीव संघर्ष : चिंतेची बाब
डोंगरगावातील घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की वन्यजीव आपल्या अधिवासातून बाहेर पडून गावांमध्ये येण्याच्या घटना वाढत असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जंगलातील पाण्याची कमतरता, अन्नाचा अभाव आणि अधिवासातील व्यत्यय यामुळे अशा घटना वाढू लागल्या आहेत.








