spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी दिलासा : आता डिजिटल 7/12 साठी ब्लॅक-एंड-व्हाईट प्रत मान्य

तिरोडा :- तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रांवर 7/12 उतारा काढण्यासाठी केवळ रंगीत प्रिंटरची सक्ती न ठेवता ब्लॅक-एंड-व्हाईट प्रिंटरचा वापर स्वीकारावा अशी महत्त्वपूर्ण सूचना जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

या निर्णयासाठी विजय रहांगडाले, आमदार तिरोडा–गोरेगाव विधानसभा क्षेत्र, यांनी स्वतः पुढाकार घेत वेळेवर दखल घेतली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर माननीय जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी यासंदर्भात अधिकृत सूचना पत्र जारी केले.

तसेच यासंबंधीचे निवेदन तातडीने जिल्हा स्तरावर पाठवून प्रशासनाला कार्यवाहीस प्रवृत्त केल्याबद्दल तहसीलदार, तिरोडा यांचेही विशेष योगदान आहे.

शेतकरी बांधवांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, यामुळे अनावश्यक खर्च टळणार असून धान खरेदी प्रक्रियेत सुलभता येणार आहे. डिजिटल 7/12 मिळवण्यासाठी रंगीत प्रिंटरची अट शिथिल करून ब्लॅक-एंड-व्हाईट प्रिंटर मान्य केल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उपक्रमाबद्दल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, बिरसी (रु. क्र. 986) चे अध्यक्ष हंसराज महादेव रहांगडाले यांनी आमदार महोदय, जिल्हा पणन अधिकारी महोदय व तहसीलदार महोदय यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, प्रशासनाने दाखविलेली संवेदनशीलता कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

Popular Articles