spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही करावी

– जोशीवाडी झोपडपट्टीच्या पाहणीनंतर आयुक्त यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर :- लक्ष्मीनगर झोनमधील जोशीवाडी अधिसूचित (नोटिफाइड) झोपडपट्टी ची पाहणी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता. 24) केली व या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याच्या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त मंगेश खवले, नगररचना विभागाचे उपसंचालक गिरीश गोडबोले, सहायक संचालक ऋतुराज जाधव, सहायक आयुक्त  धनंजय जाधव, कार्यकारी अभियंता अजय पाझारे, झोनल स्वच्छता अधिकारी प्रवीण चव्हाण, उपअभियंता अभिजीत नेताम व माजी नगरसेविका सोनाली कडू उपस्थित होते.

जोशीवाडी झोपडपट्टी सरकारी मालकीच्या जागेवर वसलेली आहे. शासनाच्या अखत्यारित असलेल्या अग्निशमन महाविद्यालयाने या्संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्याला असून ही झोपडपट्टी अधिसूचित झालेली आहे. या 46 झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याच्या संदर्भात कार्यवाही करून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

Popular Articles