spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ८२ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुषंगाने रविवार व सोमवारी (ता.२३व२४) रोजी शोध पथकाने ८२ प्रकरणांची नोंद करून ६१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला.

यात हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत २१ प्रकरणांची नोंद करून ८ हजार ४०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १०० दंड) या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून २०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.४०० दंड) या अंतर्गत ४ प्रकरणाची नोंद करून १ हजार ४०० रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत (रू.२००० दंड) प्रमाणे २ प्रकरणांची नोंद करून ४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत २७ प्रकरणांची नोंद करून ३७ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे( रू.१००० दंड) अंतर्गत एका प्रकरणाची नोंद करून १ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच सार्वजनिक रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत एका प्रकरणाची नोंद करून १ हजार रुपयांची वसूली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास (रू.२०० दंड) प्रमाणे २० प्रकरणांची नोंद करून ४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास(रू.१००० दंड) ४ प्रकरणांची नोंद करून ४ हजार रूपांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या मे. दी.मेमोस psych कॅफे यांच्यावर वायू प्रदूषण केल्याबद्दल १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या मे. अविनय एन्क्लेव यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या बद्दल १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या मे. श्रद्धा स्वीट यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत एकूण ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Popular Articles