किशोर साहू, मौदा :- ग्रामपंचायत निमखेडा चे माजी सरपंच तथा मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद बरबटे यांनी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याच रामटेक येथील कार्यालयात प्रवेश केला. याप्रसंगी माजी उपसभापती ज्ञानेश्वर चौरे, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख विनायक महादुले, सरपंच धम्मजीत गजभिये,राजकुमार भोयर, सुधीर भाकरे, माजी उपसरपंच विनायक घाटबांदे , शिवसेना पदाधिकारी धनराज शेळके, धर्मराज झलके, अशोक कारेमोरे, योगराज घोरपडे, राहुल सोमनाथे सह इतरही शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत निमखेडा माजी सरपंच तथा मौदा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रमोद बरबटे यांच्या राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश









