spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खात्यात 47000(47 हजार) रक्कम शिल्लक असतानाही 1000 (एक हजार)रुपयाचा चेक केला रक्कम पुरेशी नसल्याच्या कारणावरून बाउन्स, बँक ऑफ महाराष्ट्र तारसा निमखेडा शाखेच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर 

किशोर साहू, मौदा ,ता. २५:- ग्रामपंचायत धनी ने न्युज पेपरचे एजंट किशोर साहू यांना न्युज पेपरचे देयके म्हणून एक हजार रुपयांच्या बँक ऑफ महाराष्ट्र ,तारसा निमखेडा या शाखेचा धनादेश दिला होता. मात्र खात्यात 47 हजार रुपयाची रक्कम शिल्लक असतानाही बँकेच्या शाखेने खात्यात रक्कम पुरेशी नसल्याच्या कारणावरून चेक बाउन्स करून उलट चेक बाउन्स चार्जेस 590 रुपये ग्रामपंचायत धनी च्या खात्यातून काढलेले आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र तारसा निमखेडा शाखेच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे.

याबाबत संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी विचारपूस करण्यासाठी मागील एक महिन्यापूर्वीपासून न्यूज पेपर चे एजंट तथा पत्रकार किशोर साहू बँकेच्या तीनदा चकरा माराव्या लागल्या. पहिल्यांदा गेले असता तेथील लिपिक अंकिता रायपुरे यांनी चेक संबंधित बँकेचे अधिकारी रोशन बडे हे नरखेड शाखेत बँक अधिकाऱ्याच्या तुटवडा असल्याने तिथे गेले असल्याचे सांगितले, दुसऱ्यांदा बँकेचे व्यवस्थापक तिवारी यांनी अधिकारी बडे हे सुट्टीवर असल्याचे सांगितले .शेवटी तिसऱ्यांदा शुक्रवार 20 नोव्हेंबरला बडे यांना चेक बाउन्स प्रकरणी विचारपूस केली असता, बँकेत पुरेशी रक्कम शिल्लक असतानाही , शिल्लक पुरेशी नसण्याच्या खोट्या कारणावरून चेक बाउन्स का झाला ?याचे उत्तर बँक ऑफ महाराष्ट्र च्या मुंबई येथील सर्विस बँकेकडून मिळेल असे त्यांनी सांगितले.

चेक बाउन्स प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षेचे प्रावधान आहे. मात्र खात्यात पुरेशी शिल्लक असतानाही चेक बाउन्स करणाऱ्या शाखेला संबंधित विभाग कोणती शिक्षा देतो ?याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्हाचे लक्ष वेधले आहे.

Popular Articles